02 December 2013

सुगरणीचा खोपा

आरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिल्लांसाठी तिनं झोका झडले टांगला

पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला
तिचा पिलान्मधी  जीव जीव झाडाले टांगला

खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी जरा देखरे माणसा

तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओठ
तुले दिले रे देवानं दोन हात दहा बोट

----इयता ५वि- बहिणाबाई चौधरी

No comments:

Post a Comment