14 January 2010

हि अशीच असते वेळ

हि अशीच असते वेळ
अन असे मनाचे खेळ
हि अशीच असते वेळ
तो शुष्क उन्हाळा
ती वळवाची सर
तो धुंद श्वास अन...
त्या ओळी अलवार
तो उष्ण निवारा
कसा गोठतो काळ
हि अशीच असते वेळ
कधी वेडे भास...
समोर ती येताना
कधी अडके श्वास...
ती दूर जरा होताना
अन उरे ऊरी मग
जीवघेणी एक कळ
हि अशीच असते वेळ
कधी हात गुंफता
इंद्रधनू विणलेले
कधी श्वास सुरांचे
नाते मनी भिनलेले
कधी उजाड उरला
एकाकी रडला माळ
हि अशीच असते वेळ
किती भिजले डोळे
हसताना रडताना
किती गुंतत गेलो
उगा कधी चिडताना
हे मन उलगडता...
परत मनाच्या जवळ...
हि अशीच असते वेळ....
स्वाती कुलकर्णी
पुणे.

No comments:

Post a Comment