14 January 2010

अथांग

माझ्या मनात वादळ
तुझ्या ओठी स्मितहास्य
माझ्या मनात वेदना
तुझ्या डोळ्यात रहस्य

कसा देऊ मी भरोसा
जीव आतमध्ये जळे
तुझी तीच शांत मुद्रा
तुझे तेच शांत डोळे

नाही क्षण समाधान
माझी त्रस्त दैनंदिनी
तुझी स्थिर तीच पण
अबोल गूढ वाणी

क्षण मिटले मी डोळे
तुझ्या डोळ्यात पाहून
गेली वेदनाच माझी
अथांगात त्या न्हाऊन

झाले तुझ्यात विलीन
मन शांत शांत झाले
अन अथांग दुःखाचे
स्मित माझ्या ओठी आले

स्वाती कुलकर्णी
पुणे.

No comments:

Post a Comment