नाकेला अन् गुलजार | सावळा नि सुंदर भासे ||
इवल्याशा त्याच्या देही | सरदारी ऐटविलसे||
डोळ्यात चमक पाण्याची | न्यारीच नजर दाण्याची||
छाती न पुढे जाण्याची | दुष्टांचा कर्दनकाळ||१||
मावळे जमवुनी बाळे | खेळती खेळ मैदानी||
अंगरखा, कंबरपट्टा | ती विजार तंग तुमानी||
लंगोट्या पोरान्माधुनी | लष्करी पेरतो वाणी||
गरीबांचा हा सरदार| भक्तीला पुरा दिलदार||२||
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment