10 March 2010

पडू आजारी

पडू आजारी, मौज हीच वाटे भारी
नकोच जाणे मग शाळेला
काम कुणी ना सांगे मजला
मऊ मऊ गादी निजावयाला
चैनच सारी..... मौज हीच वाटे भारी

मनुका, बेदाणा, साखर, लिंबू, संत्री आणा
साबुदाण्याची खीर कराना...
चैनच सारी..... मौज हीच वाटे भारी

1 comment:

  1. स्वाती,
    "पडू आजारी" ही कविता इतकीच आहे का? आणि या कवितेच्या कवीचे नाव काय आहे. तुझ्या आईच्या शालेय जीवनातल्या कविता इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete