माझी आई म्हणजे श्रीमती विजयप्रभा कुमारराव कुलकर्णी आणि पुर्वाश्रमीची विजयप्रभा गंगाधरराव माडीवाले (जन्म : २३ डिसेम्बर १९४३. शिक्षण : एम. एस्सी. बी. एड.).
ती शाळेत जायला लागली ते १९४५ पासून. आणि तेंव्हापासून म्हणजे १ली पासून ते ९वी पर्यंतच्या खूप कविता अजूनही पाठ आहेत.
हे त्या कवितांचं यश, माझ्या मम्मीचे यश कि त्यांना शिकवणा-या शिक्षकांचं यश माहित नाही पण मला माझ्या मम्मीच्या स्मरणशक्तीचं खरच खूप आश्चर्य वाटतं आणि अभिमानही.
या कविता माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि मला त्या आवडल्या. त्या तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून हा खटाटोप.
काही कविता अतिशय अर्थपूर्ण,भावपूर्ण आणि हेलावून टाकणाऱ्या आहेत; तर काही अगदी विनोदी काही बालमनाच्या विश्वात नेणा-या तर काही निसर्गाचा अविष्कार सांगणा-या .
चला तर मग आपण सुरु करूयात यांचा आस्वाद घ्यायला.
जाता जाता एक विनंती. अभिप्राय अवश्य कळवा. तुम्हाला, तुमच्या आई, बाबा, काका, काकू, मामा, मामी, मावशी किंवा मित्र आप्तेष्ट यांना शालेय,विद्यालयीन, पदवी व पद्युत्तर अभ्यासक्रमातील (पण लक्षात राहिलेल्या ) काही कविता आठवत असतील तर जरूर पाठवा( इतरही चालतील पण अभ्यासक्रमातील आहेत किंवा नाही ते नमूद केले तर अजून मजा येईल. ).
धन्यवाद: स्वाती कुलकर्णी

No comments:
Post a Comment