05 April 2010

रानपाखरा
रोज सकाळी येशी माझ्या घरा|
गाणे गावूनी मला सुखविशी मीत्र जीवाचा खरा|
शरीर निळसर शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी|
सतेज डोळे चमचम करीती जणू रत्ने गोजीरी|
पाय चिमुकले, पंख चिमुकले, देह तुझा सानुला|
अफाट ऐशा आभाळातून कैसे उडता येते तुला|
सूर्यासंगे जाशी येशी सदा कदा का बरे|
शेजारी आहेत काय रे परस्परांची घरे|
देह एवढा अपाय कोणी करेल तुजला इथे|
म्हणुनी कां तुज रवीबरोबर माय तुझी धाडीते|

1 comment:

  1. रानावानातुनी कशी निसटुनी ये माझया अंगणी हे विद्दहरनि
    ही कविता कधी वाचली आहे का आणि वाचली असेल तर प्लीज़ मला पाठवाल का mahendra1212@gmail.com

    ReplyDelete