मोगा-याचा हार
मुलगा: हा हार शुभ्र किती आई|
किती कोमल सुंदर पाही क्षणभरी||
किती वास मधुर या येई|
मम चित्त ओढुनी घेई बघ तरी||
कशी फुले डवरली असती|
किती अलंकार यापुढती बहुपरी||
भूवरी जन्म घेतरी वास जनाशिरी कसा हा मिरवी|
जनमने कशाने वळवी वद तरी||
आई: मधुवासे प्रीय हा सकला|
स्वगुणाने तू हो बाळा त्यापरी||
हा धवलत्वे सुन्दरस्त चारीत्रे शोभे तैसा व्यापारी||
हा दिपवी जसा जगभरा|
तेजे तू लोपवी धीरा त्यापरी||
यापरी वागशील जरी सकल जन तरी|
तुजसी मम तनया शिरी धरतील हारासमया कधी तरी||
05 April 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment