15 April 2010

दिपवाळी

आली दिपवाळी गड्यांनो आली दिपवाळी||धृ||

रोज रोज शाळा पुरे तो आला कंटाळा|
चार दिवस आता मनाला कसली ना चिंता|
उडू बागडू जशी पाखरे स्वैर अंतराळी||१||

मौजेने न्हाऊ कपाळी लाल गंध लाऊ|
अलंकार लेऊ करुनी थाट माट जेऊ|
लाडू, करंज्या, शंकरपाळी खाऊ कडबोळी||२|

नळे, चंद्रज्योती, फटाके, फुलबाज्या, वाती|
दारूकाम सोडू धडाधड बार नवे काढू|
उडवू बंदूक लुटीपुटीची घालूनिया गोळी||३||

  खेळगडी ना ना जमवुनी खेळू खेळांना|
बांधुनिया किल्ले करू या तयावरी हल्ले|
भावी पुरुषार्थाचे कित्ते गिरवू या काळी||४||

खेळाचा धंदा येतसे भरती आनंदा|
फारच गमतीचे खरोखर दिवस दिवाळीचे|
तुच्छ कडी, अंगठ्या, कंठी, भिकबाळी||५||  

6 comments:

  1. संपूर्ण कविता वाचून खूप आनन्द झाला. माझे वडील म्हणत असे ही कविता. दोन नवीन कडवी आज माहीत झाली. धन्यवाद

    ReplyDelete
  2. लहानपण उजळले,सगळा वर्ग एका सुरात ही कविता गात असे.

    ReplyDelete
  3. शाळेत उद्या अनुगायन घेणार

    ReplyDelete
  4. संपूर्ण कविता वाचून खूप आनन्द झाला

    ReplyDelete
  5. माझे वडील म्हणत असत

    ReplyDelete
  6. माझे वडील म्हणत असत

    ReplyDelete