15 April 2010

फुलपाखरू
फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू||धृ||

पंख चिमुकले निळे जांभळे छान किती दिसते
फुलपाखरू ||१||

ह्या वेलीवर फुलांबरोबर गोड किती हसते
फुलपाखरू||२||

मी धरू जाता येईना हाता दूरच ते उडते
फुलपाखरू||३||

2 comments:

  1. लहानपणीची कविता सापडल्या मुळे खूप आनंद झाला.
    धन्यवाद.
    --–-नूतन धारवाडकर

    ReplyDelete